रबी हंगामासाठी जिल्ह्यात 39 केंद्रांवर धान खरेदी सुरू

कोणत्या तालुक्यात किती केंद्र?

कढोली येथील धान खरेदीचा शुभारंभ करताना मा.आ.कृष्णा गजबे

गडचिरोली : रब्बी हंगाम 2024-25 अंतर्गत शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 39 खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी रबी धानाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.

या खरेदी केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या 2300 रुपये प्रतिक्विंटल या दराने धानाची खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी कुरखेडा तालुक्यात – 17 खरेदी केंद्र, कोरची तालुक्यात – 4 केंद्र, आरमोरी तालुक्यात – 3 केंद्र, वडसा तालुक्यात – 1 केंद्र, गडचिरोली तालुक्यासाठी – 3 खरेदी केंद्र, धानोरा तालुक्यात – 2, तसेच सिरोंचा तालुक्यात – 9 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापकांनी केले आहे.