गीता हिंगे यांचा डॅा.आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव

भाजपतर्फे सत्कार सोहळा

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांना डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल भाजपच्या महिला आघाडीतर्फे त्यांचा सत्कार सोहळा शासकीय विश्रामभवनात (सर्किट हाऊस) मोठ्या उत्साहात पार पडला. “सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हिंगे यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “सामाजिक परिवर्तन आणि सेवा हेच त्यांचे खरे शस्त्र आहे. त्यांचे कार्य समाजहिताचे असून, अशा व्यक्तीमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला खंबीर बळ मिळते,” असे म्हणत त्यांनी हिंगे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. (अधिक बातमी खाली वाचा)

याप्रसंगी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, डॉ.चंदा कोडवते, तालुका अध्यक्ष रोशनी वरघंटे, माजी सभापती रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, प्रिती शंभरकर, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, पल्लवी बारापात्रे, रुपाली कावळे, सीमा कन्नमवार यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.