Home राजकीय घडामोडी ‘मिनी मंत्रालया’तील सदस्यांचे आरक्षण 13 ला ठरणार

‘मिनी मंत्रालया’तील सदस्यांचे आरक्षण 13 ला ठरणार

'जिप-पंस'साठी इच्छुकांना संधी

गडचिरोली : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या 13 आॅक्टोबरला जिल्हा व तालुका मुख्यालयी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिलांसाठी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण ठरविण्यात येणार आहे.

सदर आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया सोडत पद्धतीने पार पडणार आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय सभा निश्चित करण्यात आल्या आहेत. 12 पंचायत समित्यांकरिता संबंधित तहसील कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी सभा घेण्यात येईल.

कुरखेडा, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी आणि सिरोंचा या ठिकाणी सभा सकाळी 11 वाजता, तर कोरची, आरमोरी, धानोरा, मुलचेरा आणि भामरागड येथे सभा दुपारी 3 वाजता होणार आहेत.

सदर सभांना जिल्हा परिषद व पंचायत समितीतील इच्छुक रहिवाशांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.