सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आज गडचिरोलीत मुक्कामी

रविवारी इंजेवारी, देऊळगावात भेट

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल दि.27 आणि 28 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

शनिवार, 27 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गडचिरोलीत येऊन विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. रात्री शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम राहील.

रविवार, दि.28 रोजी सकाळी सकाळी 6.30 वाजता जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रांगणात पोलीस दलातर्फे आयोजित ‘गडचिरोली महामॅरेथॉन’ला उपस्थित राहून सकाळी 10 वाजता चुरचुरा (ता.गडचिरोली) येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी 11.15 वाजता इंजेवारी (ता.आरमोरी) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे सांत्वनपर भेट, तर दुपारी 12.15 वा. देऊळगाव (ता.आरमोरी) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतील. दुपारी 1 वाजता देऊळगाव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.