Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीच्या चार विद्यार्थ्यांना मिनी गोल्फ राष्ट्रीय स्पर्धेत स्थान

गडचिरोलीच्या चार विद्यार्थ्यांना मिनी गोल्फ राष्ट्रीय स्पर्धेत स्थान

महाराष्ट्र संघात करणार प्रतिनिधीत्व

गडचिरोली : नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय मिनी गोल्फ सबज्युनिअर व ज्युनियर संघात गडचिरोली येथील कार्मेल स्कूलचे विद्यार्थी यथार्थ लांडे, नृप उंदीरवाडे आणि कारमेल स्कूल चामोर्शी येथील अनन्या वासेकर तथा कृष्णा पापडकर यांनी उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र मिनी गोल्फच्या सब जुनियर संघात स्थान मिळवले आहे.

त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय भारतीय मिनी गोल्फ संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, एशियन मिनी गोल्फ संघटनेचे सचिव डॅा.सुरज येवतीकर, गडचिरोली जिल्हा मिनी गोल्फ संघटनेचे सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, ओमप्रकाश संग्रामे, प्रा.रूपाली पापडकर तसेच संजय मानकर, प्रशांत म्हशाखेत्री, प्रसाद ताजने, आशिष निजाम, कपिल बागडे आणि आई-वडिलांना दिले आहे.