अहेरी : येथील इंदिरा गांधी कॉलनीतील (बेघर कॉलनी) अशोक मांडवगडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने हतबल झालेल्या कुटुंबियांना माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी आर्थिक मदत देत मोठा आधार दिला.
घरातील कर्त्या पुरूषाची ही अवस्था झाल्याने मांडवगडे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले होते. अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेघर कॉलनीत धाव घेऊन मांडवगडे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासोबत पुढील उपचारासाठी सुद्धा मदत करणार असल्याचे सांगितले. हर्षवर्धनबाबांच्या या भूमिकेमुळे मांडवगडे परिवाराला मोठा आधार मिळाला आहे.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, रोशन सैय्यद, सलीम शेख, प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते.
































