गडचिरोली : चंद्रपूर येथे पार पडलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय नागपूर विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आगाज पर्वात गडचिरोली जिल्ह्याच्या चमुने आपली छाप पाडत प्रथम क्रमांक पटकावला. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्या नेतृत्वाखाली संघाने हे घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धांमध्ये महिलांच्या खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर धाव स्पर्धेत गडचिरोलीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर क्रिकेटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुष संघाने खो-खो, 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर, रिले यामधे प्रथम क्रमांक पटकाविला. तर व्हॅालिबॅाल, कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
याशिवाय वैयक्तिक नृत्यात सुनील ताकतोदे (प्रथम), एकल नाट्यात प्रियंका डांगेवार (द्वितीय क्रमांक), फॅशन शो मध्ये कांतारा (प्रथम क्रमांक), तसेच समुह नृत्यात महाराष्ट्राची लोककला नृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला. स्वतः डॉ.सचिन मडावी यांनी लोकनृत्यात सहभागी होऊन अप्रतिम सादरीकरण केले. तसेच निवासी शाळा या विषयावर भावनिक असे नाटक सादर केले. यामधे कुलदीप मेश्राम, राहुल गोविंदलवार, स्नेहा गाढवे, स्नेहा शिंदे, माधुरी कासर्लावार, खुशी वरगंटीवार, विद्या दहागावकर, तृप्ती लेनगुरे, सुप्रिया अल्लम, श्रीलता कोठारी, अभिलाषा बोरकर, उज्ज्वला तगरे, वनश्री, सचिन मांढरे, सोहेल शेख, दिनेश किरंगे, विष्णु घुबे, धर्मेंद्र अंबिलकर, बंडू कोडापे, अमित खोब्रागडे मून, दुधे, रामटेके, आंबुले, निखाडे, नंदनवार, पत्रे, डोंगरे, पोटे, लांजेवार, दुर्गम, यश इत्यादी सहभागी झाले होते.
































