पोलीस भरतीकरीता येणाऱ्यांची मोफत निवास-भोजन व्यवस्था

राष्ट्रवादी युकाँने केली सोय

गडचिरोली : पोलीस विभागामार्फत शिपाई व वाहन चालक या पदाकरीता आजपासून सुरू केलेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो उमेदवार येणार आहेत. दिलेल्या तारखेला पहाटेलाच त्यांना मैदानावर हजर व्हावे लागणार असल्यामुळे त्या उमेदवारांना गडचिरोलीत आधल्या दिवशी येऊन मुक्कामी राहावे लागणार आहे. अशा उमेदवारांची नि:शुल्क निवास आणि भोजन व्यवस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून केली जाणार आहे.

ज्या उमेदवारांना गडचिरोली शहरामध्ये पोलीस शिपाई मैदानी चाचणीकरीता आल्यानंतर राहण्याची व्यवस्था होत नाही, अशा गरजु उमेदवारांकरीता (युवक व युवती) स्वतंत्र राहण्याची व भोजनाची व्यवस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीतर्फे ग्रँन्ड हॉटेल, कोर्ट चौक, सेमाना रोड, गडचिरोली येथे करण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करावा. लिलाधर भरडकर – 9404519680, हिमांशू खरवडे – 7588723366, सुमीत चव्हाण – 9881642736, मंथन बुलबुले – 8975269202, संकेत जनगनवार – 7387286615, बादल कंकलवार – 9422317449, प्रतिक उपासे – 9763187519, कुणाल चिलगेलवार- 8263016341, चेतन पेंदाम – 7972772302, सुजल सोरते – 9209278325