राज्याच्या मुख्य सचिवांनाच केले गडचिरोलीचे पालक सचिव

राजेश अग्रवाल यांची नियुक्ती

गडचिरोली : पायंडा मोडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आता चक्क राज्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनाच पालक सचिव नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश सोमवारी (दि.23) निर्गमित करण्यात आला आहे.

पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना मार्गी लावण्यासह वाढत्या औद्योगिकरणासाठी समन्वय ठेवणे अधिक सोयीचे व्हावे म्हणून ही जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.