Home दैनंदिन बातम्या भोंदुबाबा अशोक खरातप्रकरणी जादुटोणा कायद्याचा वापर करा

भोंदुबाबा अशोक खरातप्रकरणी जादुटोणा कायद्याचा वापर करा

महाराष्ट्र अंनिसची निवेदनातून मागणी

गडचिरोली : भोंदुबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांची फसवणूक केल्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच संबंधित राजकारणी मंडळी, सरकारी अधिकारी यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच जादुटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समितीच्या गडचिरोली शाखेने केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठवले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर भंडागे, सचिव भोजराज कान्हेकर, गोपाल रायपुरे, महिला प्रमुख संघमित्रा राजवाडे, निशा बोदेले यांनी केले. यावेळी प्रमोद राऊत, दशरथ साखरे, तुळशिराम सहारे, चोखोबा ढवळे, नरेंद्र शेंन्डे, जैराम उंदिरवाडे, लवंकुश भैसारे, नामदेव दुधे, नेताजी मेश्राम, मोरेश्वर निमगडे, अशोक कोल्हारकर, सिध्दार्थ भानारकर, धनराज पाझारे, केशव गणवीर, डोमाजी गेडाम, प्रेमदास रामटेके, नाजुक भैसारे, सुमन उंदिरवाडे, अहिल्या सहारे, देवला डोंगरे, देवला शेंन्डे, अमिता भैसारे, प्रेमलता कान्हेकर, विशाखा देवतळे, माया मेश्राम, लता भैसारे, लता रामटेके, शशिकला सहारे, मंगला बाबनवाडे, वृक्षाली उंदिरवाडे, वाजुदा शेख, लिला वाकडे, ज्योती मेश्राम, कल्यानी गोंडाणे, त्रिवेणी मेश्राम, रजनी चौरे, अनन्या उंदिरवाडे, अहिल्या सहारे आदी अनेक महिलांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदविला.