Home दैनंदिन बातम्या ग्रामविकासासाठी सर्व स्तरांतून सहकार्य आवश्यक- कृष्णा गजबे

ग्रामविकासासाठी सर्व स्तरांतून सहकार्य आवश्यक- कृष्णा गजबे

भागवताच्या समारोपात सत्कार

कुरखेडा : भागवत प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला दिशा मिळत असून, गावागावांत संघटित होऊन ग्रामविकासाला चालना देण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन आरमोरीचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

नवरगाव गावकऱ्यांच्या वतीने श्रीराम नवमी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंतीनिमित्त हभप मुक्ताबाई हत्तीमारे यांचे ग्रामगीता प्रवचन व भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपीय गोपालकाल्याला माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ग्रामविकासाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. या कार्यक्रमानिमित्त गाव व महिला मंडळाच्या वतीने गजबे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, उद्धव पाटील कवाडकर, पुरुषोत्तम उईके, खुशाल कवाडकर, मोरेश्वर चौरीकर, संजय राऊत, नथुजी महाराज दखणे, राजाराम कोसरे, प्रेमा कोवे, मुखरू मेश्राम, चंद्रशेखर शेंडे, साईनाथ कवाडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन जगदीश मानकर यांनी, तर आभार प्रकाश कोसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवरगाव युवक मंडळ, महिला मंडळ व बालगोपाल यांनी विशेष परिश्रम घेतले.