Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यात 13 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू, एकत्र जमण्यास मनाई

जिल्ह्यात 13 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू, एकत्र जमण्यास मनाई

सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी

गडचिरोली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 29 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1) व 37(3) अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, स्फोटक अथवा दाहक पदार्थ बाळगणे, प्रक्षोभक घोषणा, भाषणे, फलक किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.