चामोर्शी : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे (दिना धरण) पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सोडण्यात आले. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पीकांची गरज लक्षात घेऊन आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर हे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या रोवण्या पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील बांध्यांमध्ये पाणी नाही. त्यामुळे या भागातील रोवणी पूर्णपणे बंद झाली होती. शेतकरी नागरिक कसेबसे मोटर पंप लावून शेतातील रोवणी करीत होते व वारंवार पाणी सोडण्याबाबत मागणी करत होते. या विषयाची दखल घेऊन आमदार मिलिंद नरोटे यांनी दिना धरण, कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
भाजपचे जिल्हा पदाधिकारी, चामोर्शी मंडळ पदाधिकारी आणि घोट सुभाषग्राम मंडळ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घोट मार्गावरील गोलाबाई देवस्थान येथे पूजन करून उपअभियंता विकास दूधबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नमवार जलाशयाचे पाणी विधिवत पूजन करून सोडण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, माजी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोटच्या सरपंच रूपाली दूधबळे, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनी वरघंटे, महामंत्री संजय खेडेकर, विकास मैत्र, कविता किरमे, विलास उईके, राजेश्वर चूधरी, नीरज रामानुजनवार, नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे, प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे, संतोष दुधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, महेश विस्वास, सुकंठ रॉय, प्रकाश सातपुते व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































