गडचिरोली : येथील सुंदरकांड भजन मंडळ आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित कावड यात्रेला दुर्गामाता मंदिर, त्रिमूर्ती चौक येथून पूजा-अर्चनेनंतर भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी कावड हाती घेऊन यात्रेत सहभागी होत भाविकांचा उत्साह वाढविला.
गेल्या 9 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेली ही कावड यात्रा पायी सेमाना देवस्थान येथे पोहोचली. त्यानंतर पूजा-अर्चना करून रात्रीचा प्रवास करत ही यात्रा आज (दि.19) मार्कंडा देवस्थान येथे पोहोचणार आहे. तेथे पूजा, भजन, आरती व धार्मिक कार्यक्रमाने यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी नगरसेवक रमेश चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव हरडे, सचिव मनोज देवकुले, अविनाश पाल, भारत भारद्वाज, प्रफुल्ल बिजवे, निलेश पटले, कैलास शर्मा, सुचक, जक्कुलवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त व व्यापारी बांधव उपस्थित होते. यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
































