Home राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चा आज गडचिरोलीत कार्यकर्ता मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चा आज गडचिरोलीत कार्यकर्ता मेळावा

प्रदेशाध्यक्ष शिंदे, अनिल देशमुख येणार

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज (दि.25) गडचिरोलीतील संस्कृती सांस्कृतिक भवनात होणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यकर्ता मेळाव्याला अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारूख, जिल्ह्याचे निरीक्षक अॅड.हिराचंद बोरकुटे, जिल्हाध्यक्ष तथा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक अतुल गण्यारपवार आणि प्रदेश सरचिटणीस अॅड.संजय ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे.