
गडचिरोली : येथील प्रभाग क्रमांक 11 मधील पंचवटी नगरातील शिव गणेश मंडळ विविध सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. परिसरात एकोपा कायम राहावा याकरिता दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेश उत्सवात यावर्षी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी वार्डातील 25 पेक्षा जास्त युवकांनी रक्तदान करून इतर युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. यासोबतच शासनाच्या योजनांचा सामान्य जनतेला लाभ व्हावा याकरिता आरोग्य शिबिरादरम्यान ‘आयुष्यमान भारत’ कार्ड काढून नागरिकांना दिलासा देण्याचे काम यावेळी गणेश मंडळाच्या युवकांनी केले.
या उपक्रमाला नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती तथा रायुकाँ (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखील चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, आरोग्य सभापती शेखर आखाडे, नगरसेवक सागर निंबोरकर, महिला बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका शिल्पा हेमके, नगरसेविका प्रतिभा कुमरे, नगरसेविका वर्षा शेडमाके, नगरसेवक रविन्द्र मेश्राम, नगरसेविका माधुरी मंगरे आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.
मागील काही वर्षांपासून पंचवटी नगरातील गणेश मंडळाचे युवक पुढाकार घेऊन वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात. याशिवाय उत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबवून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या युवकांकडून केला जात आहे.
या उपक्रमांसाठी मंडळाचे अध्यक्ष कुणाल मडावी, उपाध्यक्ष आदिनाथ मंगर, सचिव मंथन बुलबुले, कार्तिक बुलबुले, पंकज भांडेकर, प्रणय खैरे, संदीप पेदापल्ली, अक्षय भीष्णूरकर, हिमांशू खरवडे, संकेत जनगणवार, संदेश कारेमोरे, काव्य वालदे, चेतन उरकुडे, रितिक धोटे, अमोल जेट्टीवार, प्रशांत ठाकरे, श्रीकांत नन्नावरे, लंकेश वाढनकर, अनुराग कुडकावार, अजीत खोब्रागडे, तुषार रोहणकर, प्रणय खैरे, केतन कुकडे, तन्मय चिकराम, यश गलगट, पंकज भांडेकर, अजय कुमरे, मनोज सेलोटे, अक्षय पटेल, कल्याणी कुडकवार, सुयश खरवडे, शिवकुमार गुंगे आदींनी सहकार्य केले.































