
गडचिरोली : मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध जनसमस्यांसाठी नेहमी आवाज उठविणाऱ्या छत्रपती सेनेच्या वतीने महर्षि वाल्मिकींच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेटोला येथे शेकडो माता-भगिनींना वस्त्रभेट दिली. छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला छत्रपती सेनेचे जिल्हा प्रमुख यादव लोहंबरे, जिल्हा संघटक विनोद चापले, उपजिल्हा प्रमुख गोपाल मोंगरकर, तालुका प्रमुख यादव चौधरी, प्रशांत ठाकुर, दीपक लाडे, विलास मुळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी लिखीत महाकाव्य रामायण हे भगवान श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील आदर्श सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. कर्तव्याची आणि धर्माची (सदाचाराची) शिकवण देते. रामायणातील प्रत्येक पात्र आणि प्रसंग मानवी जीवनासाठी मार्गदर्शक ठरेल असा आहे, असे प्रतिपादन यावेळी अरविंद कात्रटवार यांनी केले.
कात्रटवार म्हणाले की, जीवन हे सुंदर असून जगण्याचा मार्ग कसा निवडावा हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख, संघर्ष, काटेरी वाटा येतात. मात्र आलेल्या संकटाचा सामना करून जो पुढे जातो तोच जीवनात यशस्वी होतो. प्रभू श्रीरामाला सुध्दा वनवास काळात विविध संकटाचा सामना करावा लागला होता. संकटावर मात करून जीवनात यशस्वी होता येते, हेच महर्षी वाल्मीकी लिखित रामायण आपल्याला शिकवण देते. महिला ही अबला नसून ती आदीशक्तीचे रूप आहे. माता भगीनींनी आलेल्या संकटाचा धैर्याने सामना करून पुढे गेले पाहिजे. आपल्या हातून चांगले कर्म घडावे हाच सेवाभाव जोपासून आपली वाटचाल सुरु असल्याचे अरविंद कात्रटवार म्हणाले.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक समाज घटकांचा विकास झाला पाहिजे. ढिवर भोई समाज बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबीत आहेत. समाजबांधव मासेमारी व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. शासनाच्या योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहचलेला नाही. ढिवर भोई समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आहे. ढिवर-भोई समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे अरविंद कात्रटवार म्हणाले.
या वस्त्रभेट सोहळ्याप्रसंगी माता-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. अरविंदभाऊंच्या हातून सेवा कार्य सदैव घडत राहावे, अशी मनोकामना माता-भगिनींनी व्यक्त केली.
याप्रसंगी विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याळ, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यांच्यासह व गावकरी उपस्थित होते.
































