गडचिरोली : वरिष्ठ गट खो-खो मुले आणि मुली यांची राज्यस्तरीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पवनी (जिल्हा भंडारा) येथे दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय संघाच्या निवडीसाठी उद्या रविवारी (दि.29) गडचिरोलीत निवड चाचणी होणार आहे.
गडचिरोलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या या निवड चाचणीतून खो-खो च्या वरिष्ठ गटातील मुले आणि मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. निवडलेला हा संघ गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल.
या निवड चाचणीसाठी सकाळी 10 वाजता खेळाडूंनी मैदानावर उपस्थित राहावे. खेळाडू व संघांनी सोबत आपले आधार कार्ड आणावे, असे आवाहन जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष प्रा.राजेश कात्रटवार, सचिव भूपेंद्र चौधरी, उपाध्यक्ष फरेंद्र कुतिरकर, कोषाध्यक्ष ओमदेव रडके यांनी केले आहे.
































