गडचिरोली : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसद भवनात हिंदू धर्माला ‘हिंसक’ म्हणत वादग्रस्त विधान केल्याने भाजपसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने इंदिरा गांधी चौकात राहुल गांधींविरोधात निदर्शने केली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात ‘राहुल गांधी माफी मांगो, हिंदू का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, राहुल गांधी मुर्दाबाद, भारत माता की जय, जय जय श्रीराम’ असे नारे देत राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, कोषाध्यक्ष गजानन येन्गंधलवार, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, वर्षा शेडमाके, रंजिता कोडापे, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवाणे, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम, शहर महामंत्री नरेश हजारे, केशव निंबोड, विवेक बैस, प्रशांत भृगवार, हर्षल गेडाम, मधुकर भांडेकर, प्रशांत अल्पटवार, नितेश खडसे, बालाजी भांडेकर, विशाल हरडे, पवन वासेकर, देवाजी लाटकर, राजू शेरकी, आकाश राऊत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, प्रतिभा चौधरी, महामंत्री पल्लवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, अर्चना निंबोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.