गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी इंडियाच्या बाजुने कौल मिळाला. या यशाचे मानकरी खऱ्या अर्थाने पक्षाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे असून त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. यात निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या वतीने विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रदेश उपाध्यक्ष कुसुम अलाम यांचाही सत्कार करण्यात आला.
काँग्रेसच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेश अध्यक्ष राधिका मखामले यांच्या पुढाकाराने टिळक भवन, दादर येथे झालेल्या या कार्यक्रमात आला. कुसुम अलाम यांनी गडचिरोली, नंदुरबार व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्षासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांची मेहनत लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
पक्षाच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, सर्व सेलच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. वजाहतअली मिर्झा, डॉ.मिनाक्षी सावळकर, कल्पना उणवणे, मजित मेमन, सविता पंडित यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला.