ओबीसी महासंघासह इतर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धरणे

मागण्या शासनाकडे पोहोचविणार

गडचिरोली : ओबीसींसह इतर मागास समाजाच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 3 या कालावधीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन ओबीसींच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपचे अनिल पोहनकर हेसुद्धा उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, तसेच ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषणा समाप्तीच्या वेळी राज्य शासनाने 29 सप्टेंबर 2023 च्या बैठकीत प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गे लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल सी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, तसेच मुख्य सचिव, ओबीसी विभागाचे प्रधान सचिव आणि केंद्र शासनाकडील प्रलंबित मागण्यांचे निवेदन महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सामाजिक न्यायमंत्री आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना पाठविण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, पांडुरंग घोटेकर, जिल्हा महासचिव सुरेश भांडेकर, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, जिल्हा संघटक चंद्रकांत शिवणकर, शंकर चौधरी, गडचिरोली तालुकाध्यक्ष सुधीर रोहनकर, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, जिल्हा महिला अध्यक्ष मंगला कारेकर, युवती जिल्हाध्यक्ष संतोषी सूत्रपवार, अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के, महेंद्र लटारे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, घनश्याम जक्कुलवार, विजय गिरसावळे, दादाजी चापले, पांडुरंग नागापुरे, गोविंद बानबले, देवेंद्र फुललेले, राजेंद्र उरकुडे, शालिकराम चापले, सुनील दिवसे, नाजूक खारकर, मारुती दुधबावरे, लुमाजी गोहणे, प्रफुल आंबोरकर, शालिग्राम विधाते, कुणाल निंबाळकर, ताराचंद भांडेकर, करमचंद भोयर, किरणकुमार शेंडे, जयंत बल्लमवार, नरेंद्र पुसदेकर, विमल भोयर, मनीषा निकोडे, सुधा चौधरी, लोमेश म्हशाखेत्री, दुशांत कुनघाडकर, अजय सोमनकर, सविता मोहुरले, कमल गेडेकर, नंदा चुटे, हर्षलता येलमुले, मनीषा बुटे, हरिदास कोटरंगे, परमानंद पुनमवार, राजेंद्र हिवरकर, प्रीती येरेकर, पंकज खोबे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागडे, प्रफुल बारसागडे, बादल गडपायले, प्रभाकर भागडकर, मधुकर लांजेकर, विजय रोडे, राजेंद्र गोहणे, विनोद लेनगुरे इत्यादीसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.