गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधील रिक्त जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपकडून अंकुश (गोलू) दिलीप नैताम, काँग्रेसकडून विनोद रामकृष्ण भांडेकर, तर अपक्ष म्हणून बावणे सुनील भास्कर यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली अरुण एम. यांनी तीनही वैध नामांकन ठरलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. येत्या 20 जून रोजी मतदान होणार असून 21 जूनला मतमोजणी होणार आहे.
भाजपचे नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांच्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अपघाती मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने इतर नगर परिषदांमधील पोटनिवडणुकीसोबत गडचिरोलीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ही निवडणूक पार पाडली जात आहे.
































