पेरमिली परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या दूर होणार, उपकेंद्राचे भूमिपूजन

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे जंगी स्वागत

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे शनिवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते 33 केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या भागात उपकेंद्राची उभारणी झाल्यानंतर वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या दूर होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी गावात आगमन होताच ना.धर्मरावबाबा यांचे वाजतगाजत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम हेसुद्धा उपस्थित होते.