
गडचिरोली : तब्बल 124 हून अधिक वर्षांच्या अखंड परंपरेसह, मध्य भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून नावारूपास आलेल्या ‘रोकड़े ज्वेलर्स’चे 11 वे नवीन शोरूम गडचिरोलीत सुरू होत आहे. आज (दि.15) टीव्हीस्टार शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन होणार आहे. (खाली वाचा)

चंद्रपूर मार्गावरील हॅाटेल लँडमार्क समोरील 3600 चौरस फुटांच्या जागेत पसरलेले हे शोरूम गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक ज्वेलरी स्थळांपैकी एक बनणार आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या पर्वावर दि.15, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तीन दिवस सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) 50 टक्के आणि हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर (डायमंड ज्वेलरीवर) 100 टक्के सूट राहणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत रोकड़े ज्वेलर्सचे प्रमोटर भैयाजी रोकडे, वंदना भैयाजी रोकडे, व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकड़े, संचालक सारंग भैयाजी रोकडे, पारस राजेश रोकडे, प्रमोटर अनामिका राजेश रोकडे आणि संस्कृती सारंग रोकडे यांनी उपस्थित राहून रोकडे ज्वेलर्सच्या विश्वासार्ह परंपरेची आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली.
रितेश-जेनेलिया ब्रँड अॅम्बेसेडर
प्रसिद्ध सिनेस्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना रोकडे ज्वेलर्सचे अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात “महाराष्ट्राचे भाऊ आणि वाहिनी” म्हणून लोकप्रिय असलेली ही प्रसिद्ध जोडी विश्वास, कौटुंबिक मूल्ये, साधेपणा आणि आधुनिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते. ही मूल्ये रोकडे ज्वेलर्सच्या वैशिष्ट्यांची जुळत असल्याने त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर केल्याचे यावेळी राजेश रोकडे यांनी सांगितले.
सोन्याचे दागिने पुन्हा बजेटमध्ये आणणार
22 कॅरेट गोल्ड ज्वेलरीवर मेकिंग चार्जेस अवघ्या 5 टक्केपासून लागणार आहेत. हे दागिने सर्टिफाइड आणि हॉलमार्क असलेले राहतील. नवीन पिढीच्या ग्राहकांसाठी हलके, मजबूत आणि दैनंदिन जीवनशैलीला साजेसे 18 कॅरेट प्लेन गोल्ड ज्वेलरीचे अथांग कलेक्शन सादर केले जात आहे. दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्यात येण्यासाठी महिनेवारी गुंतवणूक योजनाही रोकडे ज्वेलर्समध्ये राहणार आहे.
डायमंड, पोलकी आणि ब्रायडलचे नवीन कलेक्शन
आगामी महिन्यांत रोकड़े ज्वेलर्स डायमंड, पोलकी आणि ब्रायडल दागिन्यांचे विशेष कलेक्शन सादर करत आहे. दागिन्यांची शुद्धता स्वतः तपासण्यासाठी अत्याधुनिक कॅरेटमीटर मशीन्स या शोरूममध्ये उपलब्ध राहणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांसह भविष्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही ज्वेलरी शोरूम उघडले जाणार असल्याची माहिती रोकडे ज्वेलर्सच्या वतीने देण्यात आली.
































