गडचिरोली : येथील फुले वार्डातील बुद्ध विहाराच्या पटांगणात संविधान जागर साप्ताहानिमित्त ‘संविधान पढो, देश जोडो’ कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. यानिमित्त आयोजित डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेवरील गीतांच्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले. यावेळी संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून लोकशाही मूल्य, संविधान, सामाजिक एकता या विषयांवर बहारदार गीतांच्या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी केले. त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घाटकांना काँग्रेसच्या माध्यमातून कशा प्रकारे न्याय देता येईल याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी यावेळी अनिरूद्ध वनकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाविषयीं, संविधानिक लोकशाहीबद्दल, आणि सामाजिक एकतेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने अॅड.रामभाऊ मेश्राम, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, अॅड.सचिन फुलझेले, प्रा.कमलेश निमगडे, रुपेश टिकले, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वारघन्टीवार, स्वीकृत नगरसेवक नंदू कायरकर, अब्दुल पंजवानी, प्रशांत खोब्रागडे, राजेंद्र दरडे, पंकज बारसिंघे, पोलीस पाटील अनिल खेवले, जावेद खान, मिलिंद खेवले, नरेश रामटेके, अरुण रायपूरे आणि शहरातील समस्त नागरिक, तथा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































