

गडचिरोली : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली येथील रेड्डी गोडाऊन चौकातील नवशक्ती दुर्गामाता उत्सव मंडळात भक्तिमय वातावरणात देवीचे पूजन व आरती करण्यात आली. माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती करण्यात आली.
यावेळी डॉ. नेते यांनी दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होत समस्त नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य आणि आनंद नांदो अशी प्रार्थना केली. नवरात्रोत्सव हा शक्ती, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा पवित्र सण असून, या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या धार्मिक कार्यक्रमाला नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, नगरसेवक सागर निंबोरकर, सामाजिक नेते शेखर साळवे, प्रकाश निकुरे, राजू मल्लेलवार, निलेश बोमनवार, मनीष फुस्कुटे, सोनू ब्राह्मणवाडे, किशोर मगरे, रुपेश टेपलवार, मनिष बानबले, मुकेश बरदालकर, अभी म्हशाखेत्री, योगेश जेंगठे, प्रमोद खोब्रागडे, रवि भडांगे, रवि कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































