गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज गुरुवारी, (16 एप्रिल) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता गडचिरोली येथे आगमन झाल्यानंतर पोलीस मुख्यालयात आयोजित रोजगार मेळावा आणि पोलीस विभागाच्या वाहन लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजतानंतर त्यांचा वेळ राखीव असून दुपारी 2.15 वाजता ना.जयस्वाल हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.
































