प्राचार्य रामटेके यांच्याकडून वृद्धाश्रमात किट्सचे वाटप

गडचिरोली : तथागत बुद्ध जयंतीचे औचित्य साधून येथील प्राचार्य हेमंत रामटेके व त्यांच्या परिवारातर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यकमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विजय रामटेके, रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गंगाधर चंदावार उपस्थित होते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी प्राचार्य हेमंत रामटेके हे भोजनदान करत होते. परंतु सध्याचे वातावरण बघता त्यांनी वृद्धांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचे ठरविले. यावेळी डॉ.श्रृति विजय रामटेके, माला हेमंत रामटेके, ज्योती विजय रामटेके, रुची हेमंत रामटेके, सचिन बोरकुटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी वृद्धाश्रमाचे संचालक सुनील पोरेड्डीवार यांनी शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमाबद्दल प्रा.किरकिरे, मारोती कडुमवार, रामचंद्र गणवीर, हरिचंद्र तोरे, अन्थोनी, कांताबाई कोठारवार, मंजुळा टिकले, विमल रोहणकार आदींनी समाधान व्यक्त केले.