Home दैनंदिन बातम्या दहावी सीबीएसईच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिलीचे घवघवीत यश

दहावी सीबीएसईच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिलीचे घवघवीत यश

गुणवत्तेची परंपरा ठेवली कायम

गडचिरोली : बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल अँड ज्युनिअर कॅालेज या सीबीएसई स्कूलने उल्लेखनिय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली. या शाळेने 100 टक्के निकाल दिला असून 82 टक्के विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

यावर्षीच्या प्लॅटिनमच्या 82 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 67 विद्यार्थ्यांनी 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यात 20 विद्यार्थ्यांनी 90 ते 100 टक्के गुण मिळवले. 25 विद्यार्थ्यांना 80 ते 89 टक्के गुण आणि 22 विद्यार्थ्यांना 70 ते 79 टक्के गुण मिळाले आहेत.

या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाने अभिमान व्यक्त केला आहे. संस्थेचे सचिव अझिज नाथानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले.

प्राचार्य रहीम अमलानी यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भविष्यातही उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्लॅटिनम ज्युबिली स्कूलचे हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि सर्वांगिन विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.