हनुमान जयंतीनिमित्त चामोर्शीत शोभायात्रा, युवा पदाधिकाऱ्यांचा उत्साहाने सहभाग

उत्सव समितीसह युवक मंडळाचा पुढाकार

चामोर्शी : हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी युवक मंडळ व हनुमान जयंती उत्सव समिती, बाजार चौक चामोर्शी येथील युवा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढली. हजारो युवकांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील हनुमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शोभायात्रेची सुरूवात नारळ फोडून भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, नगरसेवक निकू नैताम यांच्या हस्ते रथावर आरूढ भगवान हनुमानाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हा संयोजक व चामोर्शी शहर महामंत्री रमेश अधिकारी व तुळशीदास नैताम, तसेच बाजार चौक हनुमान जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.