गडचिरोली : जिल्ह्यातील नेताजी नगर (ता.चामोर्शी) येथे श्री श्री शांती हरी मंदिराच्या वतीने वार्षिक मतुआ धर्ममिलन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी भेट देऊन श्री हरीचाँद ठाकुरांचे दर्शन घेतले. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या महोत्सवात मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, चामोर्शी तालुका महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अनिता राय, सामाजिक नेते प्रमोद आसूटकर, मृदुल मजुमदार, बलाई मंडल, रितेश सरकार, रंजित मालाकार, दियंकर कीर्तनिया, कोमल विश्वास, दिलीय मलंगी, सुधान्य ढाली, बिनय राय, मलिन है, प्रल्हाद मनुमदार, चित्त सरदार, दुलाल विश्वास, सितीस राम, अरविंद बाईन, चंदन मंडल, गोविंद कविराज, सुजित बैरागी, असित मजुमदार, अमल हालदार, जोवन विश्वास, प्रणव मजुमदार, कोन विश्वास, पंकज मित्र, गौतम हास, सुशांत वैद्य, मनोरंजन खा, मोती हास, जितेन दास, विमल खाए सांसरी, रंजित मंडल, बिषय शिल, श्रीधाम बाडई यांची उपस्थिती होती.
नेताजीनगरचा परिसर भक्तिमय
या महोत्सवाची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गंगापूजनाने झाली. त्यानंतर घटस्थापना व निशान पूजा, तसेच युगावतार भगवान श्री हरीचाँद ठाकुरांची वंदना संपन्न झाली. संध्याकाळी बके दान जागमन, त्यानंतर अहोरात्र हरिनाम संकीर्तन व भक्तिमय हरीसंगीताने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी आरती व नगर कीर्तन, त्यानंतर हरिनाम महासंकीर्तन व मानव संगित आयोजित करण्यात आले होते. जय हरीबोल, जय हरीचाँद, जय गुरुचाँद अशा जयघोषाने नेताजीनगरचा परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला.