चामोर्शी : स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय या विनाअनुदानित तत्वावरील महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन परिषदेच्या (नॅक बँगलोर) केंद्रिय समितीने ग्रेड ‘ब’ दर्जाचे मानांकन दिले आहे.
दि.30 व 31 डिसेंबर 2024 दरम्यान नॅक समितीच्या दोन दिवसीय पाहणीत या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सोयी, विद्यापिठीय परिक्षांचे निकाल, ग्रंथालय, कार्यालयीन सेवा, प्राध्यापकांची गुणवत्ता, संशोधन कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, अभ्यासक्रम निर्मितीतील सहभाग, सुसज्ज इमारत, क्रीडांगण, आदींचे मुल्यमापन करून समितीने महाविद्यालयाला ‘ब’ श्रेणी दिली.
या महाविद्यालयास भेट देणाऱ्या नॅक समितीचे प्रमुख डॉ.निलिमा श्रीवास्तव (दिल्ली) होत्या. डॉ.जगन्नाथ लेंका (ओरिसा) व डॉ.लिम्बांगौड सयदगार (तेलंगाणा) हे सदस्य होते. महाविद्यालयाचे नॅककडून हे पहिलेच मुल्यांकन होते. पहिल्याच मुल्यांकनात सीजीपीए 2.36 ‘ब’ दर्जा मिळवून शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाने चामोर्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, उपाध्यक्ष अमोल गण्यारपवार, सचिव साधना गण्यारपवार तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अजिंक्य गण्यारपवार, प्र.प्राचार्य शिल्पा काशेट्टीवार (गृह-अर्थशास्त्र), समन्वयक प्रा.कृणाल आंबोरकर (इंग्रजी), विभागप्रमुख प्रा.नोमेश्वर झाडे (अर्थशास्त्र)यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.बी.व्ही धोटे (राज्यशास्त्र), प्रा.डॉ.दीपिका हटवार (मराठी), प्रा.डॉ.मिरा वाघमारे (मानसशास्त्र ), प्रा.धनंजय यादव (हिंदी), प्रा.नितेश सावसागडे (इतिहास ), प्रा.डी.गुढदे (समाजशास्त्र) या सर्वांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी भावना सुर (ग्रंथालय), सुनील आभारे, नितेश पोरटे, सौरभ सहारे (लिपिक), संजय गडकर, आशिष मेश्राम, लोभेश गोर्लावर, भावना चांदेकर (शिपाई) यांनीही यासाठी मोठी मेहनत घेतली.
विशेष म्हणजे विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालय असून देखील पहिल्याच मुल्यांकनात ‘ब’ दर्जा मिळवून एक वेगळा नावलौकिक या महाविद्यालयाने मिळविला आहे.