
गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते आणि आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन जयंती उत्सवासाठी शहरात येणाऱ्या अनुयायांना व नागरिकांना थंडावा मिळावा या हेतूने मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या वतीने ‘शरबत वाटप’ उपक्रमाचे आयोजन चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयासमोर करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डॅा.अशोक नेते, डॅा.मिलिंद नरोटे यांनी स्वत: अनेक नागरिकांना शरबत वाटप करून जयंतीच्या आनंदात सहभाग घेतला.
विचारांचा वारसा जपणे काळाची गरज : डॉ.नेते
याप्रसंगी अभिवादन करत मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि त्यांचे विचार ही आपली खरी संपत्ती आहे. महामानवाच्या जयंतीचा उत्साह साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि जनसेवा करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने आमदार डॅा.मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष अँड.प्रणोती सागर निंबोरकर, कि.मो.प्र.स. रमेश भुरसे, बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका योगिता पिपरे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते तथा स्वीकृत नगरसेवक सुधाकर येनगंदलवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते, डॅा.चंदा कोडवते, महिला बाल कल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेविका वर्षा शेडमाके, अर्चना निंबोड, साक्षी बोल्लुवार, शिल्पा गव्हारे, अवंती धंदरे, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, गजानन येनगंदलवार, गोवर्धन चव्हाण, अनिल पोहनकर, विनोद देवोजवार, दिनेश नवघडे, दीपक सातपुते, संजय बारापात्रे, देवाजी लाटकर, प्रा.अरुण उराडे, तसेच भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































