गडचिरोली : शहरातील पोटेगांव बायपास या मुख्य मार्गावरील साई मॅजिक फुलवारी या दुकानाला रविवारी सकाळी आग लागून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॅार्ट सर्किटने ही आग लागल्याचे समजते.
दि.16 जुलैला सकाळी अंदाजे 10.30 वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. यात डेकोरेशनचे बरेच साहित्य होते. ते जळून गेले. यामुळे दुकान मालक प्रमोद खोबरागडे यांचे अंदाजे 7 लाखांचे नुकसान झाले. खोब्रागडे यांच्याकडे 10 मजुर काम करीत होते. ते तिरुपती येथे दर्शनाला गेले आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता मजुर कामावर आले असता दुकान आतून जळत असल्याचे दिसून आले. प्रिती खोबरागडे यांनी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्याकडे या घटनेची माहिती दिली.