Home क्राईम फार्महाऊसमध्ये जमिनीत टाकं करून लपविला होता दारूसाठा

फार्महाऊसमध्ये जमिनीत टाकं करून लपविला होता दारूसाठा

शिवनी येथे पोलिसांचा छापा

शेतातीत घरात जमिनीखाली बनविलेल्या टाक्यातील दारू शोधताना पथक.

गडचिरोली : दारुबंदी असताना छुप्या पद्धतीने दारुची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी शेतातील घरात लपविलेला दारूसाठा गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि पोलीस अंमलदारांनी गडचिरोली पोलीस स्टेशनअंतर्गत शिवनी येथे धाड टाकून केलेल्या कारवाई 1 लाखांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

प्राप्त माहितीनुसार, सहायक पोलीस अधीक्षक तथा गडचिरोलीचे एसडीपीओ अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, शिवनी येथील किरण शंकर ताडपल्लीवार याने आपल्या शेतातील फार्महाऊसमध्ये अवैधरित्या देशी दारु विक्रीकरीता साठा करून ठेवली होती. त्यानुसार हिरडे आणि पथकाने पंचासमक्ष त्या घराची तपासणी केली असता, घरात जमिनीच्या आतमध्ये बनविलेल्या सिमेंट टाक्यात देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. पण आरोपीला पोलिसांच्या कारवाईची आधीच चाहूल लागली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने त्या बाटल्या पेटवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अर्धवट जळालेला देशी दारुचा साठा जप्त केला.

या कारवाईत 90 मिली मापाच्या अर्धवट जळालेल्या 2,000 नग निपा (एकूण किंमत 1,00,000 रुपये) जप्त केल्या. फरार आरोपी किरण शंकर ताडपल्लीवार याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.