Home दैनंदिन बातम्या शिवम इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चातगावच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

शिवम इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चातगावच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

डी.फार्मसीमध्ये 80 टक्के निकाल

प्रथम व द्वितीय वर्षात प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी 2026 मधील डी.फार्मसी प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात शिवम इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चातगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. दोन्ही वर्षांचा निकाल 80 टक्के लागला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यामधे प्रथम वर्ष डी.फार्मसीमध्ये निकिता साळवे हिने 84.90% गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. द्रितीय प्रिती हिचामी हिला 75.60% गुण, तर अश्विनी घाटोळे हिने 73% गुण मिळून तृतीय स्थान पटकावले आहे. द्वितीय वर्ष डी. फार्मसीमध्ये ए.ए. रामने यांनी 77.55% गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. द्वितीय क्रमांकावर निकिता सडमेक हिने 75.83% गुण प्राप्त केले आहे. तर तृतीय स्थान अमित रविकांत डेलीकर यांनी प्राप्त करून 74.73 टक्के गुण पटकावले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे, प्राचार्य तेजस्विनी बिट्टूरवार, अधिव्याख्याता धवल सुचक, ईशा बैस, शिवम पेंदोरकर, अनिल मेश्राम , गुरुदेव सेडमाके, शुभांगी हलामी यांनी अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शभेुच्छा दिल्या.