Home दैनंदिन बातम्या मत्स्यबीज संगोपन व स्वावलंबन योजनेअंतर्गत मत्स्य साहित्याचे वितरण

मत्स्यबीज संगोपन व स्वावलंबन योजनेअंतर्गत मत्स्य साहित्याचे वितरण

व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत

गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येत असलेल्या गडचिरोली जिल्हा मत्स्यबीज संगोपन व स्वावलंबन योजनेअंतर्गत (2026-27) पात्र लाभार्थ्यांना कोंदावाही जप्पी, व सरांडा येथे मत्स्यबीज, मत्स्यखाद्य व आवश्यक मत्स्य साहित्याचे वितरण करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित या कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत ग्रामीण आजीविका फाउंडेशन (BRLF) यांच्या सहकार्याने वॉटर संस्था (WOTR) धानोरा यांच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर डोंगरे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमोल सोनोने, कनिष्ठ लिपिक राहुल मेश्राम, मेगा पाणलोट प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक महेश आभारे, उपजीविका तज्ञ सुयोग तिवाडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते योजनेअंतर्गत निवड झालेल्या 4 लाभार्थ्यांना मत्स्यबीज, मत्स्यखाद्य व मत्स्यपालनासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना आधुनिक व शाश्वत मत्स्यपालन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या योजनेमुळे ग्रामीण भागात मत्स्यव्यवसायाला चालना मिळून लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय वॉटर संस्था धानोरा यांनी केले.