Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत उद्या जिल्हास्तरीय रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

गडचिरोलीत उद्या जिल्हास्तरीय रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन

गडचिरोली : रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व आरोग्यविषयक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट रोजी कृषी चिकित्सालय, शासकीय रोपवाटिका सोनापूर, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

रानभाज्यांमध्ये विविध पोषक व औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा आहारातील वापर आणि महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्ह्यातील शेतकरी, महिला व शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महोत्सवात सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन रानभाज्यांची ओळख व महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांनी केले आहे.