Home राजकीय घडामोडी अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आविसंचा ताडगावात चर्चासत्र मेळावा

अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आविसंचा ताडगावात चर्चासत्र मेळावा

तळागाळातील गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळवून देणार

भामरागड : तालुक्यातील ताडगाव येथे आदिवासी विद्यार्थी संघ आणि ग्रामसभांच्या वतीने चर्चासत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आविसंचे कार्यकर्ते आपल्याच पाठिशी असल्याचे कंकडालवार यांनी दाखवून दिले. तळागाळातील गोरगरीबांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहणार, असा विश्वासही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना कंकडालवार म्हणाले, आदिवासी विद्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा असून याचा आम्हाला अभिमान आहे. वेळ देऊन जे लोक संघटनेचे काम समोर वाढवित आहेत त्याचे काम कौतुकास्पद आहे. योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासोबत ग्रामीण परिसरात संघटन वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मी या क्षेत्रातून निवडून आलो नव्हतो, मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. त्यामुळे जिल्ह्यात व तालुक्यात सर्वाधिक निधी आणून विकासाची कामे करता आली. येणाऱ्या काळातही मी नेहमी तुम्हाच्या सोबत राहण्यासाठी तत्पर आहो, अशी ग्वाही कंकडालवार यांनी यावेळी दिली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी संघटनेच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. आविसंने अन्याय अत्याचाराविरोधात सर्व घटकांसोबत उभे राहून आपले हक्क मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवली. तळागाळातील कार्यकर्ता हा संघटनेच्या आत्मा असल्याचे सांगत येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जोमाने कार्य करत संघटनेसाठी वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

या मेळाव्यात मंचावर भामरागड नगर पंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, माजी सभापती लालसू आत्राम, अहेरीच्या नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, भामरागडचे नगरसेवक सर्जु सडमेक, राकेश महाका, दिलीप उईके, प्रतिष्ठीत नागरिक तपेश हलदर, आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, श्रीराम हेडो, प्रज्वल नागुलवार, आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, सुनिता कुसनाके, अहेरीचे माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे, सुरेखा आलाम, वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी, किस्टापूरचे माजी सरपंच अशोक येलमुले यांच्यासह महेश लेकुर, प्रमोद आत्राम, नरेंद्र गर्गम, कमला कुरसाम, नीलेश वेलादी, सीताराम मडावी, किरण कोरेत, डॉ.सत्तमवार, संजय येजुलवार, अनिल करमरकर, नामदेव हिचामी, बालु बोगामी, अजय गावडे, तसेच परिसरातील अनेक गावातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. सदर चर्चासत्र मेळाव्याच्या यशस्वीसाठी आयोजनासाठी भामरागडचे माजी उपसभापती लालसू आत्राम, जगदीश कोंकमुट्टीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.