भाजपने केली आरमोरी विधानसभा क्षेत्रात मंडळ अध्यक्षांची खांदेपालट

पारधी, खरकाटे, खरवडे, नरोटींना संधी

गडचिरोली : भारतीय जनता पक्षात सध्या मंडळ, तालुका, शहर अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया जोमाने सुरू आहे. सोमवारी माजी आ.कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चार मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे, मा.आ. कृष्णा गजबे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. संघटन पर्वाअंतर्गत मंडल अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही नेमणूक प्रक्रिया मा.आ.गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली.

नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांमध्ये देसाईगंज मंडळ (ग्रामीण)च्या अध्यक्षपदी सुनील पारधी, तसेच मंडळ (शहर) अध्यक्षपदी सचिन खरकाटे यांची नियुक्ती करण्यात आली. आरमोरी तालुका मंडळ अध्यक्षपदी पंकज खरवडे, कोरची तालुका मंडळ अध्यक्षपदी सदाराम नरोठी यांची नियुक्ती करण्यात आली. कुरखेडा तालुक्याच्या मंडळ अध्यक्षपदी चांगदेव फाये यांना पुन्हा संधी देण्यात आली.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी, महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव भूमिका बर्डे, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी बालकल्याण सभापती रोशनी पारधी, जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, जिल्हा सचिव सचिन वानखेडे, महामंत्री वसंता दोनाडकर, मोहन पाटील गायकवाड, गोपाल उईके, अश्विनी कांबळे, योगेश नागतोडे, सदानंद ठाकरे, जोतू तेलतुंबडे, केवळराम झोडे, कुलदीप आमले, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, शंकर पारधी, चक्रधर नाकाडे, हरीश डांगे, सरपंच धनंजय तिरपुडे, अजय राऊत, भास्कर बनसोड, हेमा कावळे, शामराव अलोणे, प्रमोद झिलपे, अरुण राऊत, आदित्य मिसार, अंचित मिसार, विलास पारधी, रोशन ठाकरे, संदीप राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.