गडचिरोली : भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ येत्या १३ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त नियोजित कार्यक्रम आखण्यासाठी गुरूवारी शासकीय विश्राम भवनात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.
घर चलो अभियान, मेरी माटी मेरा देश, सामाजिक कार्यात काम करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींच्या भेटीगाठी, सरलॲप डाऊनलोड करणे व भाजपा महिला कार्यकर्ता मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी यावेळी अध्यक्षीय समारोप करताना केले.
यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश सरचिटणीस (एस.टी. मोर्चा) प्रकाश गेडाम, महिला प्रदेश चिटणीस रेखा डोळस, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव गिता हिंगे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक आशिष पिपरे, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, तसेच मोठ्या संख्येने महिला भाजपा पदाधिकारी उपस्थित होत्या.