Home राजकीय घडामोडी विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांच्या कल्याणासाठीच्या बांधिलकीची साक्ष

विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांच्या कल्याणासाठीच्या बांधिलकीची साक्ष

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो. आमचा ऐतिहासिक अर्थसंकल्प, आमचा विकासाचा रेकॉर्ड, लाडकी बहीण योजना, तीन मोफत सिलिंडर, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, आमची ही कामं लोकांसमोर आहेत.

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेचं स्वागत करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज राहा, असे सांगितले. आपण काळ-वेळ न बघता अथक परिश्रम घेतले आहेत. आता लोकांकडे जाऊन हात जोडून मतदान मागण्याची वेळ आली आहे. आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशी असलेल्या आपल्या बांधिलकीला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाचे कल्याण आणि गरिबांच्या उन्नतीसाठी समर्पित असल्याचे अजित पवार म्हणाले.