विद्यमान खासदार किरसान यांनी घेतली माजी खासदार नेते यांची सदिच्छा भेट

पक्षभेद विसरून रंगल्या गप्पा

गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते गप्पांमध्ये रंगले.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॅा.किरसान आणि नेते यांच्यात मुख्य लढत होऊन अशोक नेते यांची हॅट्रिक किरसान यांनी रोखली होती. पण निवडणूक संपल्यानंतर पक्षीय मतभेद असले तरी मनभेद ठेवायचे नाही म्हणून डॅा.किरसान यांनी ही सदिच्छा भेट घेतली. अशोक नेते यांनीही तेवढ्याच मोकळेपणाने त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रा.राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, रजनीकांत मोटघरे, नदीम नाथानी इत्यादी उपस्थित होते.