Home राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर, धर्मरावबाबा आत्राम ठाम मांडून

राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर, धर्मरावबाबा आत्राम ठाम मांडून

वॅार्डावॅार्डात कॅार्नर सभांना ऊत

माजी जि.प.सदस्य निता साखरे यांचा पक्षप्रवेश करताना आ.धर्मरावबाबा आत्राम, सोबत तनुश्ररी आत्राम, रविंद्र वासेकर, रविंद्र ओल्लालवार.

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेत आपले उमेदवार उभे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शेवटच्या टप्प्यात जोर लावणे सुरू केले आहे. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आ.धर्मरावबाबा आत्राम चार दिवसांपासून गडचिरोलीत ठाण मांडून उमेदवारांसाठी कॅार्नर सभा घेत आहेत. गडचिरोली आणि देसाईगंजमध्ये शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती करून तर आरमोरीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जात आहे.

निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जोर लावला. माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अॅड.संजय गुरू, माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, भाजपच्या जिल्हा महामंत्री गीता हिंगे, माजी जि.प.सदस्य निता साखरे अशा अनेकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी-शिवसेना युती यांच्यातच खरी लढाई असल्याचे धर्मरावबाबा सांगतात.

आरमोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार जयकुमार मेश्राम यांनी आपला विकासाचा संकल्प व्यक्त करताना शहराच्या हद्दीतील जि.प.च्या 12 शाळा नगर परिषदेकडे घेऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा आणि शहरवासियांना चांगले शिक्षण देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्यासाठी दिलीप मोटवानी व इतर पदाधिकारी मेहनत घेत आहेत.