आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॅा.देवराव होळी

चंद्रपूर शाखेकडून केला सत्कार

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवराव होळी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त चंद्रपूर शाखेच्या वतीने डॅा.होळी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव केशव तिराणिक, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम, जिल्हा महासचिव अरविंद परचाके, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर, युवा संघटक कुणाल तिराणिक उपस्थित होते.