धानोरा : येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा संकुलातील मुख्य इमारत, खो-खो मैदान, कबड्डी मैदान आणि व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा सुविधांमुळे तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होणार असून, स्थानिक खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळणार आहे.
नक्षलवादाच्या समस्येमुळे जिल्ह्याचा विकास अनेक वर्षे मागे राहिला; मात्र आता शिक्षण, क्रीडा आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी निवासी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू असून, जिल्ह्यातील युवकांना विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, ज्येष्ठ नेते विजय कुमरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गजानन साळवे, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, तालुका महामंत्री सुभाष धाईत, नगरसेवक गटनेते संजय कुंडू, नगरसेवक मल्लिक बुधवानी, राकेश खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष सरफराज शेख, जमीर शेख, मुबारक सैय्यद, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष भुमाला परचाके, माजी पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी, तारा कोटांगले, नेत्रा साळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीकांत यादव, अप्पर तहसीलदार वाडके तसेच तालुका क्रीडा अधिकारी राठोड उपस्थित होते.
































