कुरखेडा : भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या वतीने विशेष संघटनात्मक बैठक आणि पक्षाचे प्रेरणास्थान डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यत्वे ‘एसआयआर’ (SIR) अभियानाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह उपस्थित सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
अभिवादन कार्यक्रमानंतर आयोजित तालुका बैठकीत पक्षाच्या आगामी उपक्रमांवर चर्चा झाली. या बैठकीत ‘एसआयआर’ (SIR) अभियानांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून पक्ष संघटन तळागाळापर्यंत कसे मजबूत करावे, यावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, तालुका महामंत्री विनोद नागपूरकर, मंगेश मांडवे, लक्ष्मण खडसे, बाबुराव बनसोड, राकेश खुणे, प्रकाश ठाकूर, नंदकिशोर मेश्राम, रूपाली कावळे, कविता खडसे यांच्यासह कुरखेडा तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, शक्ति केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, बी.एल.ए.2, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































