Home दैनंदिन बातम्या ‘गोंडवाना’च्या 63 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड

‘गोंडवाना’च्या 63 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड

रोजगार मेळाव्यातून मिळाली संधी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील सीआयआयआयटी आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 63 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यात अॅक्सिल ग्लोबल चेन्नईमध्ये 27 विद्यार्थी, टाटा मोटर्स पुणे करिता 27 विद्यार्थी, आझाद इंजिनिअरिंग हैदराबादसाठी 7 विद्यार्थी, एचडीएफसी लाईफमध्ये 2 विद्यार्थी अशा एकूण 63 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

मेळाव्याचे समन्वयक डॉ.विवेक जोशी, कौशल्य विकास केंद्राचे सहा.आयुक्त आर.एन.माटे, सीआयआयआयटीचे अभियंता आनंद राठोड यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेत मेहनत घेतली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, कौशल्य विकास आणि कार्यक्षमता तपासून त्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या रोजगार मेळाव्याचे संचालन प्रवीण गिरडकर आणि आभार प्रदर्शन प्रियंका इडपात्रे यांनी केले.