गडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरील लक्ष्मीनगरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या वार्डात तब्बल 25 घरगुती गणपती विराजमान झाले आहेत. गणेश उत्सवामुळे लक्ष्मीनगरात श्रद्धा, भक्तीमय व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, पुरुष व बालगोपाळ घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. यातून एकमेकाबद्दल आदर सन्मान व्यक्त केला जात आहे.
लक्ष्मीनगर वार्डात वेदप्रकाश कोल्हे, महेश तिडके, अनिल प्यारमवार, कालिदास गेडाम, प्रकाश कुनघाटकर, रामदास कोराम, समीर सुरमवार, प्रमोद चिल्वरवार, सुरेश वरगंटीवार, विनोद पोरेड्डीवार, विलास पिसे, मंगेश कोतपल्लीवार, स्वप्निल कायरकर, राकेश माटेटवार, डॉ.श्याम खंडारे, पवन धाईत, नितीन कानकाटे, शिवराज नायकवाडे, सुनील सोनटक्के, अविनाश झिलपे, विनोद खोब्रागडे, व्यंकटेश्वर देसूवार, हरिदास कोकणे, दिलीप मानुसमारे, अशोक सूत्रपवार यांच्या घरी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
वॅार्डात पूजा-अर्चा, भजन, महाप्रसाद तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातून सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
































