गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रानखेडा येथील सक्रिय शिवसैनिक गोपाल पानसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबाचा आधार हिरावल्या गेल्याने पानसे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त करीत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियाला आर्थिक मदत देऊन उध्दवजींची शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देऊन दु:खातून सावरण्याचे बळ दिले.
यावेळी बोलताना कात्रटवार म्हणाले, मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे या भागात आपल्या पक्षाची ताकद वाढली आहे. कार्यकर्ते हेच पक्षाची ताकद असतात, त्यांच्यामुळेच ग्रामीण भागात काम करण्यास बळ मिळते. मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद उभी करण्यात गोपाल पानसे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एक सच्चा कार्यकर्ता आपण गमावला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी यादव लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकूर, संदीप आलबनकर, सुरज उईके, दीपक लाडे, अमित बानबले, संदीप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व रानखेडा येथील नागरिक उपस्थित होते.